Wednesday 26 September 2012

कारण विनाकारण आणि राजकारण

                    आज देशासमोर अनेक महत्वाचे प्रश्न आसताने आपल्या समोर काय चाललाय तेच कळायला मार्ग नाही. देशासमोर आर्थिक पेच आहे,विकास खुंटला आहे ,बेरोजगारी वाढते आहे , मान्सून मुळे शेतीही धोक्यात आहे ,उद्योग बंद पडत चाललेत ,गुंतवणूक आटत चाललीये आशा परिस्थिती मध्ये महत्त्वाच्या प्रश्नावरून आपले लक्ष हटवण्यात राजकारणी यशस्वी झालेत.
                दूरसंचार घोटाळा नुकताच बातम्यातून कुठे दूर झाला होता तो पर्यंत कोळसा वातावरण काळा  करून गेला. एफ.डी.आय . आणि दरवाढीने नागरिक हवालदिल होत आसाताने ममताने सरकारवरील ममता कमी करून देशच अस्थिर करण्याचा प्रयत्न केला.
             पैसे झाडाला लागत नाही असाही तर्क लढवला गेला. ममता विरळ झालेल सरकार सिंगांनी  मुलायम करून सावरले. आणि जनता महागाईचे चटके सोईस्कर विसरून गेली.
             सरकार स्थिरस्थावर झालेले पाहून दादानी राजीनामा नाट्य घडवले.

Saturday 15 September 2012

विकास - कास आणि भकास

मानवी संस्कृतीच्या विकासाबरोबर भौतिक विकास झाला.
परंतु हे होत असताने मानवाने निसर्गावर अतिरेक केला. एकीकडे मानव भौतिक सुखाने
परिपूर्ण होत दुसरीकडे नैसर्गिक साधन संपत्तीचा नाश करत होता. *विकासाची कास
धरताने मानवाने भवताल मात्र भकास केला*. या मध्ये मग ओघानेच सत्ताकारण आणि
अर्थकारण आले . विकासाच्या प्रश्नाला गालबोट लागले. भांडवलदारांनी विकासच्या
नावाखाली वारेमाप लूट सुरु केली. आणि सिलसिला सुरु झाला निसर्ग वाचविण्याचा.मग
कितेकांचे निसर्ग प्रेम उफाळून आले.या मध्ये हौसे आणि नवसे आलेच.साखळी सुरु
झाली फक्त विरोधासाठी विरोध.
एन्रॉन आपण अरबी समुद्रात बुडवून बाहेर
काढला.घरामध्ये १ मिनिट वीज गेली तर कासावीस होणारे आपण जैतापूर विरोध करायला
लागलो.एन्रॉन मुळे महाराष्ट्र आज पर्यंत अंधारात आहे.त्यात आता पुन्हा
जैतापुराला विराध .हा विरोध कुठे घेऊन जाणार आहे आपणाला.एकेकाळी
औदिगिकिकरणामध्ये प्रगत असणारे राज्यामध्ये आज बेरोजगारांची संख्या वाढत आहे.
त्यात नवीन उद्योगांना पर्यावरणाच्या नावाखाली आपला विरोध.मान्य आहे भौतिक
प्रगतीबरोबर निसर्गही टिकला पाहिजे . परंतु नवीन प्र्राक्ल्पांना विरोध म्हणजे
आडमुठे पणा झाला.
या मध्ये आता आणखी नवीन भर पडली आहे ती म्हणजे कास
पठार आणि पश्चिम घाटाची. पश्चिम घाटामध्ये अनेक वीज प्रकल्प उभे राहू शकतात
परंतु त्यामधे आता अनेक अडचणी निर्माण होणार आहेत. *आता आपल्यालाच ठरवावे
लागेल कि विकासाची कास धरायची कि कासच्या मुद्दावरून मानवताच भकास करायची.*