Thursday 8 November 2012

गरिबी

एक श्रीमंत वडील त्याचा मुलाला एका गाँवात गरिबी काय असते ते दाखवायला
घेऊन जातात.....
ते गांव फिरुन झाल्यावर ते श्रीमंत वडील त्याँचा मुलाला गरीबी बद्दल विचारतात,,,
मुलगा: आपल्याकडे १ कुञा आहे तर त्याँचाकडे ४ कुञे आहेत,,
आपल्याकडे एक स्विमीँग पूल आहे तर त्याँचाकडे मोठी नदी आहे,,
आपल्याकडे ऊजेडासाठी लँम्प आहेत तर त्याँचाकडे आकाशतले तारे आहेत,,.
आपल्याकडे जमिनीचा एक छोटा तुकडा आहे तर त्याँचाकडे मोठे शेत(जमिनीचा
मोठा भाग)आहे,,
आपण धान्य विकत घेतो तर ते स्वतः धान्य उगवतात ...
हे ऐकुन त्या मुलाचे वडील निशब्द झाले
आणि
नँतर मुलगा बोलतो:
"धन्यवाद बाबा, आपण किती गरीब आहोत हे दाखवल्या बद्दल.".......






Wednesday 7 November 2012

शासन व्यवस्था

दररोज शिस्तीचा भाग म्हणुन पेपर वाचणार्‍या बंड्याने त्याच्या बाबांना
विचारले " बाबा, शासन व्यवस्था म्हणजे काय हो ? "

" त्याचे असं आहे - " बाबा विचार करत म्हणाले, " हे बघ , मी घरात पैसे
कमवुन आणतो , म्हणजे मी भांडवलदार ; तुझी आई हा पैसा कसा आणि कुठे खर्च
करयचा ते ठरवते म्हणजे ती सरकार ; आपल्या घरात मोलकरीण काम करते ती झाली
कामगार ; तु सामान्य नागरिक व तुझा लहान भाऊ म्हणजे भावी पिढी. समजलं "

बंड्या विचार करत झोपी गेला. रात्री लहान भाऊ रडायला लागल्यावर त्याला
जाग आली. अंथरुण ओले केल्यामुळे तो रडत होता. बंड्या आईला ऊठवायला गेला.
ती गाढ झोपली असल्याने तो मोलकरीणीला ऊठवायला गेला तर तिच्या खोलीत
बंड्याचे बाबा झोपलेले होते.

सकाळी बाबांनी बंड्याला विचारले " काय बंडोपंत, कळली का लोकशाही ?"

बंड्या म्हणाला " कळलं बाबा, जेव्हा भांडवलदार कामगारांचे शोषण करत असतात
तेव्हा सरकार गाढ झोपलेले असते . देशाची भावी पिढी मुलभूत प्रश्नांसाठी
रडत असते आणि या सर्व गोष्टींचा त्रास सामान्य नागरिकाला सहन करावा
लागतो.

Tuesday 6 November 2012

क्लास

क्लास

रिक्षावाला म्हणतो…बोला साहेब कोठे जाणार?

संता- नवी मुंबईला…
रिक्षावाला- पण साहेब, कोणता क्लास मध्ये?

संता- हा काय प्रकार आहे? रेल्वेमध्ये आहे, विमानात पण आहे रिक्षात
केव्हापासून सुरु झाला.

रिक्षावाला- मीच सुरु केला आहे.

संता- बरं..बरं.. संग काय आहे यामध्ये,

रिक्षावाला- पहिल्या क्लासमध्ये म्युझिक चालू आणि खडे चुकवून रिक्षा चालवणार…

दुसर्‍या क्लासमध्ये म्युझिक बंद आणिखड्यातून रिक्षा चालवणार….
.
संता- बरं…तिसरा क्लास?
.
.
तिसर्‍या क्लासमध्ये मी मागे बसणार आणि तुम्ही रिक्षा चालवायची…!

Saturday 13 October 2012

७/१२ आता १२ च्या भावात

माहिती तंत्रज्ञानाने माणसाच्या आयुष्यात अमुलाग्र बदल केला.जग जवळ आलं अगदीच जगाच खेड सुद्धा झालं .परंतु तंत्रज्ञानाचा विकास होत असताने ते सर्व सामन्याच्या आवाक्यात यायला पाहिजे होते .तसे न होता आधुनिक तंत्रज्ञान गरिबांना महागातच उपलब्ध होत आहे . याचे ताजे उदाहरण म्हणजे ओनलाईन ७/१२ याचे देता येईल .

पूर्वी ७/१२ गावातच तलाठी साहेबांकडून मिळत असे. तोही अगदीच स्वस्तात ५ किंवा १० रुपयाला मिळत होता यात अर्थातच शासकीय शुल्क अंतर्भूत होते .आता शासनाने संगणीकरण करणाच्या नावाखाली संगणीकृत ७/१२ अनिवार्य केला आणि त्याच बरोबर हस्तलिखित ७/१२ वर निर्बध घातले .५ किंवा १० रुपयाला मिळणारा ७/१२ आता शेतकऱ्यांना २५ रुपयाला मिळतो .यात शुल्क २२.५० रुपये ( बाकीचे चिल्लर पैसे नसल्यामुळे ) म्हणजे यावरून से म्हणावे वाटते ७/१२ आता १२ च्या  भावात गेला

Sunday 7 October 2012

इंधन आणि धन

सरकार म्हणते कि तेल कंपन्यांना खूप मोठा तोटा सहन करावा लागत असल्यामुळे
इंधन दर वाढ करावी लागली.त्याच बरोबर इंधानावरील अनुदान दिल्यामुळे
सरकारची वित्तीय तुट वाढत आहे त्यामुळे अनुदान असेच सुरु ठेवणे
परवडण्यासारखे नाही.
या मधून काही प्रश्न निर्माण होतात ते म्हणजे इंधनावर सरकार किती कर
आकारणी करत आहे हे अजून एकदाही स्पष्ठ झालेले नाही.
आणि दुसरे म्हणजे तेल कंपन्यांना जर तोटा होत असेल तर आर्थिक ताळेबंदात
कैक कोटींचा नफा कासाकाई दाखवला जातो कारण कोणीही आतबट्ट्याचा व्यवहार
करत नाही.........?

Wednesday 26 September 2012

कारण विनाकारण आणि राजकारण

                    आज देशासमोर अनेक महत्वाचे प्रश्न आसताने आपल्या समोर काय चाललाय तेच कळायला मार्ग नाही. देशासमोर आर्थिक पेच आहे,विकास खुंटला आहे ,बेरोजगारी वाढते आहे , मान्सून मुळे शेतीही धोक्यात आहे ,उद्योग बंद पडत चाललेत ,गुंतवणूक आटत चाललीये आशा परिस्थिती मध्ये महत्त्वाच्या प्रश्नावरून आपले लक्ष हटवण्यात राजकारणी यशस्वी झालेत.
                दूरसंचार घोटाळा नुकताच बातम्यातून कुठे दूर झाला होता तो पर्यंत कोळसा वातावरण काळा  करून गेला. एफ.डी.आय . आणि दरवाढीने नागरिक हवालदिल होत आसाताने ममताने सरकारवरील ममता कमी करून देशच अस्थिर करण्याचा प्रयत्न केला.
             पैसे झाडाला लागत नाही असाही तर्क लढवला गेला. ममता विरळ झालेल सरकार सिंगांनी  मुलायम करून सावरले. आणि जनता महागाईचे चटके सोईस्कर विसरून गेली.
             सरकार स्थिरस्थावर झालेले पाहून दादानी राजीनामा नाट्य घडवले.

Saturday 15 September 2012

विकास - कास आणि भकास

मानवी संस्कृतीच्या विकासाबरोबर भौतिक विकास झाला.
परंतु हे होत असताने मानवाने निसर्गावर अतिरेक केला. एकीकडे मानव भौतिक सुखाने
परिपूर्ण होत दुसरीकडे नैसर्गिक साधन संपत्तीचा नाश करत होता. *विकासाची कास
धरताने मानवाने भवताल मात्र भकास केला*. या मध्ये मग ओघानेच सत्ताकारण आणि
अर्थकारण आले . विकासाच्या प्रश्नाला गालबोट लागले. भांडवलदारांनी विकासच्या
नावाखाली वारेमाप लूट सुरु केली. आणि सिलसिला सुरु झाला निसर्ग वाचविण्याचा.मग
कितेकांचे निसर्ग प्रेम उफाळून आले.या मध्ये हौसे आणि नवसे आलेच.साखळी सुरु
झाली फक्त विरोधासाठी विरोध.
एन्रॉन आपण अरबी समुद्रात बुडवून बाहेर
काढला.घरामध्ये १ मिनिट वीज गेली तर कासावीस होणारे आपण जैतापूर विरोध करायला
लागलो.एन्रॉन मुळे महाराष्ट्र आज पर्यंत अंधारात आहे.त्यात आता पुन्हा
जैतापुराला विराध .हा विरोध कुठे घेऊन जाणार आहे आपणाला.एकेकाळी
औदिगिकिकरणामध्ये प्रगत असणारे राज्यामध्ये आज बेरोजगारांची संख्या वाढत आहे.
त्यात नवीन उद्योगांना पर्यावरणाच्या नावाखाली आपला विरोध.मान्य आहे भौतिक
प्रगतीबरोबर निसर्गही टिकला पाहिजे . परंतु नवीन प्र्राक्ल्पांना विरोध म्हणजे
आडमुठे पणा झाला.
या मध्ये आता आणखी नवीन भर पडली आहे ती म्हणजे कास
पठार आणि पश्चिम घाटाची. पश्चिम घाटामध्ये अनेक वीज प्रकल्प उभे राहू शकतात
परंतु त्यामधे आता अनेक अडचणी निर्माण होणार आहेत. *आता आपल्यालाच ठरवावे
लागेल कि विकासाची कास धरायची कि कासच्या मुद्दावरून मानवताच भकास करायची.*